मनसेच्या गाव तिथे शाखा या उपक्रमाला डोंगरवाडी मधून सुरुवात

मनसेच्या गाव तिथे शाखा  या उपक्रमाला डोंगरवाडी मधून सुरुवात
----------------------------------------
पारनेर (दि.२७ ऑगस्ट).

अमित ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसेला बुस्टर डोस

गाव तिथे शाखेला  डोंगरवाडी मधून सुरुवात

तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याचे काम पाहून नागरिकांचा मनसे मध्ये प्रवेश

पारनेर तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगरवाडी येथे मनसेचा शाखा उद्घाटन सोहळा आज दिमाखात पार पडला, मनसे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेल्या राजकिय चिखल पाहता तसेच पारनेर तालुक्यातील सर्वच मनसे पदाधिकाऱ्यांची काम करण्याची अनोखी शैली आणि सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासनाला शिंगावर घ्यायला सुद्धा न घाबरणारे महाराष्ट्र सैनिक यांची कार्यपद्धती भावल्यामुळे पारनेर तालुक्यातील डोंगरवाडी येथील तरुणांनी आज मनसे मध्ये प्रवेश केला यावेळी जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला.
     याप्रसंगी मनसेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उपाध्यक्ष मारुती रोहकले, माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पवार, विद्यार्थी सेना तालुका सचिव जालिंदर बांडे, पारनेर तालुका उपाध्यक्ष महेंद्रभाऊ गाडगे, चत्तर महाराज, शिवाजी चौधरी, कल्पेश वाकळे,ऋतिक कसबे गणेश करंजेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डोंगरवाडी शाखाध्यक्ष पदी बाळशिराम डोंगरे तर उपाध्यक्षपदी संतोष गगे यांची नियुक्ती करण्यात आली,
तसेच सोपान डोंगरे यांची विभाग अध्यक्ष पदी तर कल्पेश वाकळे यांची विभाग उपाध्यक्ष पदी नव्याने नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार, यांनी नवनिर्वाचित  पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या .
     यावेळी बोलताना महेंद्रभाऊ गाडगे यांनी पारनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही परंतु सर्व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला, फक्त मतांच्या राजकारणासाठी तुमचा उपयोग केला जातो, एरवी तुम्ही जगलात काय किवा मेलात काय, याचा या नेत्यांना काहीच फरक पडत नाही, पुढच्या वेळी अशा लोकांना  लाथ घाला असं आवाहन त्यांनी केलं.
    आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता, आज पर्यंत तुम्ही सर्व राजकीय पक्षांना सत्ता दिली, सर्वांना आजमावून बघितलं फक्त एकदा मनसेला आणि राजसाहेब ठाकरे यांना आजमावून पहा असं आवाहन जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केलं, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाऊसाहेब डोंगरे, नाना डोंगरे, पांडुरंग कडुस्कर, शिवाजी डोंगरे, जना डोंगरे, भाऊ डोंगरे, शांताराम डोंगरे, शरद गगे, गुलाब लामखडे, सागर डोंगरे, हरिभाऊ लामखडे, भाऊसाहेब लामखडे, उत्तम डोंगरे, बाबाजी डोंगरे अशोक डोंगरे, दादाभाऊ डोंगरे, गणेश डोंगरे, बंटी डोंगरे, बाळासाहेब डोंगरे  इत्यादी मनसेसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

“जरांगे पाटील उपोषण थांबवा, आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे”

पारनेर तालुक्यातील जवळा गावात धूमधडाक्यात मनसेचे शाखा उद्घाटन