मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे
अमित ठाकरेंच्या जोडीला संदीप देशपांडे, ‘कृष्णकुंज’वर मेगाप्लॅन, मनसेचं मिशन मुंबई
मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे.
मुंबई :३ फेब्रुवारी २०२१
कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितित मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमितजी ठाकरे, बाळा नांदगावकर साहेब, नितीनजी सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी पक्षाने तयार केली आहे.
मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले साहेब या बैठकीला उपस्थित होते.
लोकसभानिहाय नेता -सरचिटणीस यांची कमिटी
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई साहेब यांनी बैठकीनंतर माध्यमांबरोबर बोलताना दिली. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली आहे. ही कमिटी त्या लोकसभेत जाऊन आढावा घेणार आहे. त्याचा अहवाल 25 फेब्रुवारीपर्यंत मा. राजसाहेब ठाकरे यांना देण्यात येणार आहे, असंही सरदेसाईंनी सांगितलं.
मुंबईप्रमाणे मुंबईबाहेर ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे.
लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेची समिती
१) उत्तर मुंबई
बाळा नांदगावकर साहेब – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे
२) उत्तर मध्य
संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे
३) उत्तर पश्चिम
शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे
४) दक्षिण मध्य
अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे
५) दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे
६) उत्तर पूर्व
अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे
अमित ठाकरेंच्या जोडीला संदीप देशपांडे, ‘कृष्णकुंज’वर मेगाप्लॅन, मनसेचं मिशन मुंबई
Comments
Post a Comment