महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रुईछञपती येथिल आयुष्यमान भारत आरोग्य उपकेंद्राला भेट

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रुईछञपती येथिल आयुष्यमान भारत आरोग्य उपकेंद्राला भेट



पारनेर :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रुईछञपती येथिल आयुष्यमान भारत आरोग्य उपकेंद्राला भेट  दिली. यावेळी सहकार सेना महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष डी एन साबळे साहेब व जिल्हा अध्यक्ष  नितीन म्हस्के साहेब यांच्या सह मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार साहेब उपस्थित होते.

        रुई छत्रपती येथील आरोग्य उपकेंद्रात नवीन डॉक्टर रुजू झाले आहेत , नविन रुजू झालेल्या डॉक्टर याची चौकशी करून त्यांना काही अडचणी असतील तर कधीही  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, सर्व अडचणींमध्ये मदत केली जाईल.  नविन नियुक्त डाॅक्टर मोरे साहेब व डाॅक्टर  भोई  साहेब यांना  शुभेच्छा देऊन त्याचा सत्कार केला. आरोग्य केंद्राच्या सर्व स्टापचे मनापासून आभार व्यक्त केले ते करत असलेले काम उल्लेखनीय आहे.  यावेळी पुढे बोलताना डाॅक्टर साहेब म्हणाले की आम्ही आमचं कर्तव्य करत आहे हिच आमची जबाबदारी आहे आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य प्रकारे सेवा देण हेच आमचे कर्तव्य आहे.

  असेच सर्व आरोग्य केंद्रातील डाॅक्टर यांनी ठरवायला हवं  असे महाराष्ट्र नवनिर्माण  सेना पारनेर तालुक्याच्या वतीने डाॅक्टर यांना सांगितले डाॅक्टर साहेब या कोरोणा संकटात तुम्ही देव म्हणुन जनतेसाठी आहात त्यामुळे आमची एकच इच्छा आहे रुग्ण हॉस्पिटल मध्ये भितीने जरी आला  तरी जाताना माञ हसुन जायला हवा एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे. आज भितीचे वातावरण निर्माण झाले आहे व आपण त्यांना मानसिक आधार देण गरजेचं आहे , पेंशन्ट सोबत फक्त चांगले बोला चांगली वागणूक द्या. डाॅक्टर साहेब यांनी पण आश्वासन दिले  नक्कीच रुग्णांची सेवा एकदम प्रामाणिक पणे करु असे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्मिन सेनेच्या वतीने सर्व स्टापचे मनापासून आभार मानले  व  कृतज्ञता व्यक्त केली.  

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे