"तीन वर्षांपासून शाळा मंदिरात" मनसेने दिला आंदोलनाचा इशारा
"तीन वर्षांपासून शाळा मंदिरात" मनसेने दिला आंदोलनाचा इशारा
पारनेर : तालुक्यातील गणेशवाडी रायतळे येथील जिल्हा परिषद शाळा चक्क तीन वर्षापासून मंदिरात भरत आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असूनही शाळा खोलीबाबत गांभिर्याने निर्णय घेत नसल्याने पालकांसह ग्रामस्थांत संताप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी शाळेला भेट दिली असता पावसाळ्यात विद्यार्थी मंदिरात धडे घेत असल्याचे समोर आले . पवार म्हणाले, पालक व ग्रामस्थांसमवेत चर्चा केल्यानंतर समजले की शाळेचे भूमीपूजन एक वर्षांत तिन वेळा झाले आहे.लोकप्रतिनिधींनी भूमीपुजन करुनही शाळेचे बांधकाम होणार नसेल तर दुर्दैव आहे. शाळेबाबत राजकारण विरहित काम करायला हवे. शाळा हे ज्ञान मंदिर आहे. गावच्या राजकारणात जर छोटी छोटी मुले शाळेवाचुन वेठीस धरली जात असतील तर ही मोठी शोकांतिका आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर जाहिर निषेध करत असल्याचे सांगून जर १५ दिवसात जिल्हा परिषद प्रशासनाने व शिक्षण विभागाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही व तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्यावतीने पालक आणि विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद येथे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले. तसेच सोमवारी जिल्हा परिषद सीईओ यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के , ओंकार काळे आदी उपस्थित होते .
Comments
Post a Comment