मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या नगर जिल्हा अध्यक्ष पदि अविनाश पवार यांची निवड

सुपा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष मा.अरविंद गावडे साहेब यांच्या हस्ते मुंबईत मा.अविनाश मुरलीधर पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सहकार सेनेचे सरचिटणीस मा.अनिल चितळे,राज्य उपाध्यक्ष डी एन साबळे,जिल्हा अध्यक्ष नितिन म्हस्के यादी मान्यवर उपस्थित होते.
 पारनेर तालुका उपाध्यक्ष म्हणून पवार यांनी अतिशय प्रभावीपणे काम केले असून त्यांच्या सामाजिक कामाबद्दल पक्ष श्रेष्ठींनी सन्मान केल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितिन भुतारे, मारूती रोहोकले, तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी सांगितले. जिल्हयातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पवार दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय देण्याचे काम करतील असा विश्वास डफळ यांनी व्यक्त केला.
प्रामाणिक व एकनिष्ठपणे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास न्याय देण्याची मा.राजसाहेब ठाकरे यांची या नियुक्तीवरून अधोरेखीत झाली असल्याच्या भावना मनसे सैनिकांनी व्यक्त केल्या. जिल्हाध्यक्ष डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या समस्या, बेरोजगारी, कामगारांचे शोषण, सुरक्षिततेसाठी सुविधा यासाठी मा.राजसाहेब ठाकरे यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले .

"ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटूंबातील युवक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होउन अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करीत आहे. अनेक बलाढय अपप्रवृत्तीरूपी शक्तींसमोर हिमालयाप्रमाणे उभा राहून तालुक्यात मनेसेची धुरा सांभाळत होता. त्याचा प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा व समाजावरील प्रेम याचा विचार करून पवार यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यात आली."

                              मा.अरविंदजी गावडे साहेब                                अध्यक्ष मनसे माथाडी कामगार सेना

Comments

Popular posts from this blog

“जरांगे पाटील उपोषण थांबवा, आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे”

पारनेर तालुक्यातील जवळा गावात धूमधडाक्यात मनसेचे शाखा उद्घाटन

मनसेच्या गाव तिथे शाखा या उपक्रमाला डोंगरवाडी मधून सुरुवात