पारनेर तालुक्यातील अळकुटी परीसरात ढगफुटीसदृष्य पाऊस
पारनेर तालुक्यातील अळकुटी परीसरात ढगफुटीसदृष्य पाऊस
गेल्या दोन तिन दिवसापासून अचानक ढगपुटी होऊन पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत.ओढ्या- नाल्यांना पुर आला आहे पुराच पाणी शेतात तसेच रस्त्यांवर साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला आहे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय.अळकुटी येथील पुलावरून मोटारसायकल वाहुन गेली यात मोटारसायकल चालक बचावला आहे तसेच सुझुकी कंपनीची इरटिका वाहन वाहुन गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान हानी झाली.
दरोडी ते चोंभुत नदिला पुर आला आहे अळकुटी परिसरात रस्ता पाण्याखाली गेलाय. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पारनेर- अळकुटी रोडवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय.तर कळस परिसरात अनेकांच्या घरांत शेतमालात पावसाचं पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कांदा रोपे या शेतमालचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे यांनी केली आहे
मुसळधार पावसानंतर परिसरातील शेतमालात साचलेले पाणी बाहेर काढत आहेत. पाण्याचा प्रवाह एवढा आहे की पूर आल्यासारखे दृश्य दिसत होते.त्यामुळे तात्काळ पंचनामे करावे
- महेंद्र गाडगे
Comments
Post a Comment