मनसेच्या पाठपुराव्याला यश, डोंगरवाडीचा चारा छावणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
मनसे च्या पाठपुराव्याला यश, डोंगर वाडी चा चारा छावणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, तहसीलदारांनी दिली हमी
_________________________
सोमवार ( दि. २१).
दोन दिवसांपुर्वी पारनेर तालुक्यातील डोंगरवाडी च्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याची व्यथा पारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष मा. महेंद्रभाऊ गाडगे यांच्याकडे मांडली होती, ठरल्याप्रमाणे आज सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तहसीलदार गायत्री सौंदाने मॅडम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या फेऱ्या उद्यापासून वाढवून देऊ, तसेच चारा छावणी सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून पुढील आठ दिवसात चारा छावणी सुरु केली जाईल अशी ग्वाही तहसीलदार गायत्री सौंदाणें यांनी दिली असून, पारनेर तालुक्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प प्रमाणात असल्याची जाणीव आहे, व चारा छावणी सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे लेखी निवेदन येणं गरजेचं होतं, ते आज मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी पारनेर तालुका उपाध्यक्ष महेंद्रभाऊ गाडगे व सतीश म्हस्के, तसेच सोपान भाऊसाहेब डोंगरे, बाळशिराम देवराम डोंगरे, शरद गगे, गुलाब लामखडे बाबाजी गगे, बारकू गगे, उत्तम डोंगरे, भाऊसाहेब डोंगरे, भाऊसाहेब लामखडे, राहुल डोंगरे, शांताराम डोंगरे, बंटी डोंगरे, हरिभाऊ लामखडे, तबाजी डोंगरे, शिवाजी डोंगरे, सुभाष डोंगरे, अरुण डोंगरे, संजय कडूसकर, सुरेश कडूसकर, बाळू कडूसकर, भीमा डोंगरे, रमेश डोंगरे, आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी महेंद्रभाऊ गाडगे व सतीश म्हस्के तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मदतीला धावून आल्याबद्दल आभार मानले
Comments
Post a Comment