मा.राजसाहेब ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार | मराठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा केंद्रस्थानी
मा.राजसाहेब ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार | मराठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा केंद्रस्थानी
२९ जानेवारी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे १ मार्च ते ९ मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारी बाबतची बैठक मा.राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं .
त्यानंतर मा.राजसाहेब ठाकरे हे एक मार्च ते नऊ मार्च दरम्यान अयोध्येला जाणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. अयोध्येत प्रभू श्रीरामांच दर्शन घेऊन मनसे कशाप्रकारे मोर्चेबांधणी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाचाही २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस मनसे जल्लोषात साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने मनसेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केलं जाऊ शकते.
९ मार्चच्या पक्षाच्या वर्धापन दिनाला राजसाहेब ठाकरे संबोधन करतात . यंदा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिलपर्यंत आपण मनसे सदस्य नोंदणी करणार आहोत . त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येईल . गटाध्यक्षांना नविन नाव "राजदूत" देण्यात येणार त्यांना बिल्ला देण्यात येईल. राजकारणा पलीकडच्या सुशिक्षित लोकांनी सूचना कळवाव्यात , त्यांच्या कल्पनांचा शहरांच्या विकासासाठी स्वत : हून काम करणाऱ्या लोकांना राज ठाकरेंच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं जाईल, असं नांदगावकर साहेब म्हणाले .
🚩🚩
ReplyDeleteSumit kale patil
ReplyDelete