विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्या 'कृष्णकुंज' वर, हिंदुजननायक मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरेंना भेटणार...

विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्या 'कृष्णकुंज'वर,मा. राजसाहेब ठाकरेंकडे करणार ही मागणी

अयोध्येतील प्रभू रामाचं मंदिर निर्माण कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निधी संकलनाचे काम सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून

विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्या 'कृष्णकुंज'वर, राज ठाकरेंकडे करणार ही मागणी


मुंबई, 31 जानेवारी :
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा हिंदुत्वाची शाल पांघरून घेणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मनसेच्या वतीने राज ठाकरे पुढील महिन्यांमध्ये श्रीराम प्रभू नगरी यांची अयोध्या येथे दौरा आयोजित करण्याचे जाहीर झाले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेचे काही नेते मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

प्रभू रामचंद्र मंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम सध्या विश्व हिंदू परिषद आणि भाजप सारख्या संघटना राज्यात राबवत आहेत. वेगवेगळ्या संस्था ट्रस्ट यांच्या माध्यमातून दानशूर लोक देखील मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहेत. या मंदिराच्या उभारणीचा मुद्दावर विश्व हिंदू परिषदमधील प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध देशपांडे, सहमंत्री श्रीराज नायर हे सोमवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रचार-प्रसार विभागाचे कोकण प्रांत प्रशांत पळ यांनी दिली आहे.


अयोध्येतील प्रभू श्री रामाचं मंदिर निर्माण कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निधी संकलनाचे काम सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांची भेट असून मनसेच्या वतीने देखी भविष्यात वेगवेगळ्याा ठिकाणी निधी संकलन करणे, तसंच हिंदू मुद्द्यांवरून सहकार्य करणे, अशी असण्याची शक्यताा वर्तवली जात आहे

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे