विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मा.राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला
विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कृष्णकुंजवर, मा.राजसाहेब ठाकरेंशी अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा
विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राजसाहेब ठाकरेंची भेट घेतली.
विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मा.राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला
मुंबई : १ फेब्रुवारी २०२१
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नुकतीच घोषणा झाली. या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राजसाहेब ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्या संदर्भात विश्वहिंदू परिषद कोकण प्रांता तर्फे वेगवेगळ्या स्तरावर नामांकित सन्माननीय व्यक्तींच्या भेट घेणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजसाहेब ठाकरेंची भेट घेतली.
विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला
“विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून मा. राजसाहेब ठाकरेंना मदत मिळेल”
“अयोध्या तीर्थक्षेत्र न्यास तर्फे निधी संकलन अभियान सुरू आहे. त्यासाठी आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्याकडे माहिती देण्यासाठी आलो होतो. यात त्यांचं सहकार्य मिळाव यासाठी ही भेट होती,” अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर यांनी दिली.
“अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी मदत निधी जमा केला जात आहे. येत्या मार्चमध्ये राजसाहेब ठाकरे अयोध्येत जाणार आहे. त्यावेळी राजसाहेबांकडून कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांना हा निधी देण्यात येणार आहे,” असेही मोहन सालेकर म्हणाले.
“हिंदुत्वाची भूमिका राजसाहेब ठाकरे यांनी घेतली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. राजसाहेब ठाकरे यांचे नियोजन कसे करायचे, हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला विचारल्यास विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून त्यांना नक्कीच मदत मिळेल,” असेही मोहन सालेकर यांनी सांगितले.
“राजसाहेब ठाकरेंना मदत करायला सगळेच तयार”
“विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजसाहेब ठाकरेंशी चर्चा केली. तसेच राजसाहेब ठाकरेंनीही त्यांच्याशी बातचीत केली, अशी चांगली देवाण घेवाण झाली. सगळेच राजसाहेब ठाकरे यांना मदत करायला तयार आहेत. राजसाहेब ठाकरेंचं मोहन भागवत यांच्यासोबतही चांगलं नातं आहे,” अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी दिली.
“राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्चदरम्यान अयोध्या दौरा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु होईल. प्रत्येक हिंदूने अयोध्येत जायला हवं. देवेंद्र फडणवीस देखील रामाला मानतात म्हणून तेही जातात,” असेही बाळा नांदगावकर साहेब म्हणाले.
“शिवसेना खासदार संजय राऊत यांना असं वाटतं की, शिवसेनेने सर्व काम केली आहेत. पण अयोध्येत गेल्यावर त्यांनी तिथे नक्की काय काम केलं हे समोर येईल,” असा टोलाही नांदगावकर साहेबांनी लगावला.
Comments
Post a Comment