अरे तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाहीत; त्यावर मनसैनिकाचे मन जिंकणारे उत्तर

मा.राजसाहेब ठाकरे टॅटू पाहून म्हणाले, अरे तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाहीत; त्यावर मनसैनिकाचे मन जिंकणारे उत्तर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेेब ठाकरे हे सध्याच्या तरुण मंडळींना खूप आवडतात. त्यांची भाषण शैली ही प्रत्येकालाच भुरळ पाडणारी आहे. आपण राजसाहेेेब ठाकरे यांचे बरेच जबरा फॅन पाहिले आहेत, ज्यांनी आपल्या शरीरावर राजसाहेेब ठाकरे यांचा टॅटू काढला आहे. सध्या असाच एक राजसाहेेब ठाकरेंच्या जबरा फॅनची चर्चा सुरू आहे. या जबरा फॅनने चक्क हातावर राजसाहेेब ठाकरे यांच्या नावाचा ‘राजसाहेब ठाकरे’ असा जबरदस्त टॅटू काढला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एवढेच नव्हे तर जेव्हा राज साहेेब ठाकरेंना हा टॅटू दाखवण्यात आला तेव्हाचा त्या दोघांमधील झालेला संवाद चर्चेत आला आहे.

राजसाहेब ठाकरेंचा हा जबरा फॅन मनसेचा कार्यकर्ता असून त्याचे नाव आकाश तुपे असे आहे. आकाश तुपेने जेव्हा हा टॅटू राज ठाकरेंना दाखवला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, ‘अरे हा टॅटू काढला आहे तर तुला दुसऱ्या पक्षात घेणार नाही. मग पुढे काय करणार?’ यावर कार्यकर्ता आकाश तुपेने उत्तर दिले की, ‘साहेब, मरेपर्यंत मनसे आणि तुम्ही आमचे दैवत आहात. सोडून कसे जाणार?’ सध्या आकाशच्या या टॅटू फोटो तुफान व्हायरल होत आहे.

यापूर्वी नवी मुंबई येथील कट्टर राज साहेब ठाकरे समर्थक वैभव कंक याने आपल्या पाठीवर राजसाहेब ठाकरे यांचा टॅटू काढला होता. ही बाब जेव्हा राज साहेब ठाकरे पुत्र मुलगा अमितजी ठाकरे यांचा समजताच त्यांनी या महाराष्ट्र सैनिकाला बोलावून त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर त्याची भेट राजसाहेब ठाकरेंसोबत करून दिली होती.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे