मा.राजसाहेब ठाकरेंचा जामीन सशर्त मंजूर !

राज ठाकरेंचा जामीन सशर्त मंजूर !


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेेब ठाकरे यांना टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला आहे. राजसाहेेेब ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या वकिलांचा मोठा फौजफाटा सोबत होता. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेेब ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. राजसााहेेेब ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. 

वाशी टोलनाक्यावर 2014 साली तोडफोड झाली होती. राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज साहेब ठाकरे गैरहजर राहिले. त्यामुळे राजसाहेब ठाकरेंना वॉरंट काढले गेले. राजसाहेब ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरेंना वॉरंट काढल्याने मनसेचे कार्यकर्ते वाशी टोलनाका परिसरात जमा झालेले चित्र पाहायला मिळाले.

राज ठाकरेंचे वकील म्हणतात की...

मनसे प्रमुख राज साहेब ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आले होते. मनसेच्या विधी व न्याय विभागाची फौज वाशी न्यायालय परिसरात दाखल झाली होती. राजसाहेब ठाकरेंना जामीन मंजूर होणार असल्याची आशा अ‌ॅड. रविंद्र पाष्टे यांनी व्यक्त केली होती. मनसेच्या विधी विभागाचे वकील मोठ्या संख्येने वाशी न्यायालय परिसरात उपस्थित होते.

काय आहे प्रकरण ?

26 जानेवारी 2014 रोजी वाशी मध्ये राजसाहेब ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज साहेब यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे