#महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता टेलिकॉम क्षेत्रात!

#MNS आता टेलिकॉम क्षेत्रात!
गेल्या काही वर्षांत टेलिकॉम क्षेत्राने आपलं अवघं जीवन व्यापलं आहे. काळाची पावलं ओळखून मनसेनेही टेलिकॉम क्षेत्रात दमदार पर्दापण केलं आहे. आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या २२ वर्षांहून अधिक काळ टेलिकॉम क्षेत्राचा सक्रिय अनुभव असलेले पक्षाचे उपाध्यक्ष श्री. सतीश नारकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 श्री. नारकर यांच्या नियुक्तीमुळे टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहक, विक्रेते, वितरक, नेटवर्क ऑपरेटर्स यांच्या विविध प्रश्नांना मनसे हात घालणार, हे निश्चित.
सर्वात महत्वाचं म्हणजे, टेलिकॉम क्षेत्रात अशा प्रकारची 'पहिली संघटना' स्थापन करण्याचा आगळावेगळा मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पटकावला आहे.मनसे टेलिकॉम सेना संपूर्ण महाराष्ट्रभर आपल जाळ वीणणार हे मात्र नक्की, याला राजदुत कशा प्रतिसाद देतील श्री. सतीश नारकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेतील सर्व सहकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे