महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोर्चे बांधणीला सुरुवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोर्चे बांधणीला सुरुवात
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्यात नवीन समीकरण उदयास येऊन आता वर्ष लोटले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीतील राजकीय गणितं कशी राहू शकतात याचा एक आढावा.
मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून म्हणजेच 1996 सालापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र 2022 मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्याही महत्वाची आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी वेगळी आहे. जरी निवडणूक 2022 मध्ये असली तरी चर्चा आतापासून सुरु झालीय. बिहार विधानसभा असो किंवा हैदराबाद महापालिका निवडणूक असो भाजपने ताकदीमध्ये भाजपने आपले सर्वस्व पणाला लावलं आहे.
मुंबई महापालिका निवडणूक
हैदराबाद महापालिका निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर भाजपचे पुढील लक्ष मुंबई महापालिका आहे. देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये जरी असली तरी चर्चा आणि राजकीय पक्षांची तयारी आतापासून सुरु झालीय. मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका येत्या काळात होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट 30 हजार कोटींच्यावर आहे. हे बजेट काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. संदीप देशपांडे साहेब यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की,
" मुंबई महापालिकेच्या २२७ जागा लढवण्यासाठी मनसे तयार आहे. प्रत्येक वार्डनुसार आमच्या बैठका घेऊन काम सुरु आहे. आम्ही मराठी मते खाण्यासाठी उभं राहत नसून आमची मते मिळवण्यासाठी उभे आहोत, कारण शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळलेली आहेत. आम्ही भाजपविरुद्ध सौम्य भूमिका घेतली नसून जो सत्ताधारी पक्ष आहे त्यालाच आम्ही प्रश्न विचारू मग शिवसेना असो किंवा भाजप. आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू. भाजपसोबत युती करण्याबाबत आता तशी वेळ नाही आम्ही २२७ जागांची तयारी करतोय."
Comments
Post a Comment