पारनेरच्या महावितरण कंपनीला मनसेच्या दणक्याने आली जाग

पारनेरच्या महावितरण कंपनीला मनसेच्या दणक्याने आली जाग  !
शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचा त्रास | मनसे आली मदतीला 

पारनेर: १९ फेब्रुवारी
पारनेर तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने तिन दिवसापासून बंद केला होता. पळवे बुद्रुक, खुर्दे, जातेगाव, गटेवाडी ,घाणेगाव, हंगा अशी गावांची नावं आहेत. शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कापली असं कंपनीने म्हटले. संबंधित गावातील शेतकऱ्यांनी मनसेच्या तालुका उपाध्यक्ष श्री.अविनाश पवार यांना ही गोष्ट  सांगितली व वीज पुरवठा चालू करण्यासाठी काहीतरी करा अशी विनंती केली. अविनाश पवार यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की उद्या एकतर तुम्हाला वीजपुरवठा चालू होईल नाहीतर महावितरण कार्यालय फुटेल.
      दुसऱ्या दिवशी अविनाश पवार शेतकरी बांधवांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण साहेब यांना विनंती केली व शेतकरी बांधव वीजबील भरायला तयार आहेत फक्त त्यांना वेळ आणी ठराविक रक्कम टप्या टप्याने भरण्याची मुदत द्या. जर तुम्ही विज पुरवठा चालु केला नाही तर नगर-पुणे रोड सुपा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.  याला सर्वंवी जबाबदार महावितरण असेल हे ऐकल्यावर महावितरण कार्यालतील कर्मचाऱ्यांनी लगेच  तात्काळ दखल घेऊन बंद केलेला वीजपुरवठा चालु केला.  
        वीजपुरवठा चालू केल्यानंतर मनसेच्या अविनाश पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आल्याचं दिसून आलं.
          या वेळी मनसे सुपा शहराध्यक्ष अक्षय सुर्यवंशी , पळवे गावचे विद्यमान सरपंच गंगाराम कळमकर ,उपसरपंच शिवाजी पळसकर, राजाभाऊ जाधव, सुरेश कळमकर, राजु पळसकर, सागर जाधव, हंगा गावचे माजी सरपंच रामदास साठे , मुंगशी गावचे दळवी सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे