मुंबई जिंकायला अमित ठाकरे मैदानात !

मुंबई जिंकण्यासाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; 

अमित साहेब ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली बैठकांचे सत्र
आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत.
आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत
मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. राज साहेब ठाकरे यांचे चिरंजीव नेते अमित साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या पक्षाच्या बैठका पार पडत आहेत. यामध्ये मनसेने महानगरपालिकेच्या निवडणुका स्वत:च्याच बळावर लढवाव्यात असा सूर व्यक्त होताना दिसत आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अमित साहेब ठाकरे स्वतः सगळ्या बैठकांना हजर असतात. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मुंबईतील 227 जागांवर स्वतंत्रपणे लढा, मनसेच्या कार्यकर्त्यांची मागणी
या बैठकांमध्ये मनसेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर उमटताना दिसत आहे. पालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागांवर स्वतंत्रपणे लढावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कार्यकर्त्यांची ही भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचवू. पण अंतिम निर्णय तेच घेतील, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

अमित साहेब ठाकरेंचा प्रभाव वाढणार: संदीप देशपांडे
अमितजी ठाकरे यांच्यावर सध्या लोकसभेच्या एका जागेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे की, ते एका मतदारसंघापुरते मर्यादित राहणार नाहीत. आगामी काळात अमित साहेब ठाकरे यांचा प्रभाव सर्वच महानगरपालिकांमध्ये दिसून येईल, असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला
राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता होती. गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांच्या शिष्टाईमुळे या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश आले.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे