कल्याण डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी राजसाहेब ठाकरेंची ‘त्रिमूर्ती’
कल्याण डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी राजसाहेब ठाकरेंची ‘त्रिमूर्ती’
मा.नितीन सरदेसाई साहेब, अविनाश जाधव साहेब आणि शिरीष सावंत या राजसाहेब ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेची जबाबदारी आहे
मनसे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे
कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज साहेब ठाकरेंनी वैयक्तिक चर्चा केली. मनसेची गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई साहेब, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कृष्णकुंज’वर राजसाहेब ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आता नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राजसाहेब ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, गळती रोखणे आणि अधिकाधिक उमेदवारांना विजयी करणे ही जबाबदारी आहे.
आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे
“राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत. लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे… एकच आहे… आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती कि अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की…”, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी व्यक्त केला.
मनसेच्या एकमेव आमदारासमोर आव्हानाचा डोंगर
गेल्या 10 वर्षांपासून मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. शिवसेना-भाजप युती तुटण्याआधी महापालिकेचे विरोधी पक्षपद मनसेकडे होतं. 2010 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते, तर 2015 मध्ये 9 नगरसेवकच विजयी झाले. 2019 च्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे डोंबिवलीतून निवडून आले. त्यानंतर मनसेची ताकद वाढणार असे बोलले जात होते. मात्र मनसेला खिंडार पडल्याने येणाऱ्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
Comments
Post a Comment