नगर-पुणे महामार्गवरील सुपा चौक येथे मनसेचे रास्तारोको आंदोलन


मनसेच्या आंदोलनाने महावितरनाला जाग

नगर-पुणे महामार्गवरील सुपा चौक येथे मनसेचे रास्तारोको आंदोलन

महावितरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही


पारनेर :

पारनेर तालुक्यातील सर्व शेतीपंपाचा विजपुरवठा बंद केल्याने महावितरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतीतील पिकांनी माना टाकल्या असुन आज रोजीपर्यंत महावितरण अधिकारी यांना निवेदनाद्वारे मुदत देण्यात आली होती याच अनुशंगाने सोमवारी पर्यंत विजपुरवठा सुरळीत न केल्याने नगर-पुणे महामार्ग सुपा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. डी.एन. साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्याअगोदरच महावितरणाचे अभियंता श्री अडभाई यांनी विद्युत पुरवठा खंडित न करता वीजबिल वसुली केली जाईल असे निवेदनात आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महाविरणाकडुन कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता शेतीपंपाचा विजपुरवठा खंडित केला जातो. त्याप्रमाणे सात वर्षांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना विजबिल न देता शेतीपंपाचा विजपुरवठा खंडित केला. यामुळे शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच महावितरण, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदनात महाविरणाचा आठमुठेपणा निदर्शनास आणुन दिला होता.
सुपा गटातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात सोमवार दि.१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नगर-पुणे महामार्गवरील सुपा चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. विजपुरवठा बंद असल्याने शेतकरी वर्गाचे शेतमालचे नुकसान झाले आहे, शेतमालाला पाणी साठा असुन देखील विज उपलब्ध नसल्याने अक्षरशः कांदा, गहु, हरबरा, काकडी, मका , कलिंगड इ. पिके पाण्याअभावी सुकुल गेली आहेत शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचे सांगत प्रदेश उपाध्यक्ष साबळे साहेब यांनी महाविरणाच्या अधिकाऱ्यांला चांगलेच धारेवर धरले.अभियंता अडभाई व रुद्राकर यांनी शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडित न करता विजबिल वसुली केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नियोजन रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे उपनिरीक्षक  कोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी.एन. साबळे साहेब, जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, सतिश म्हस्के,महेंद्र गाडगे, पारनेर शहर अध्यक्ष वसिम राजे,दिलिप जाधव, अतुल वरखडे, अक्षय सुर्यवंशी,संदिप चव्हाण, दत्ता पवार मुरलीधर पवार, सुरेश नेटके, पाडुरंग पवार, दिगंबर पवार, यांच्या सह महाराष्ट्र सैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे