महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्टेट बँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्टेट बँक आवारात ठिय्या आंदोलन
पारनेर :
🛑 स्टेट बँकेच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन
🛑 कामकाज सुधारणा न झाल्यास तिव्र आंदोलन
🛑 बँकेच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन स्थगित
🛑 कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे
🛑 सुट्टीच्या वेळतही कामकाज सुरु राहील
पारनेर तालुक्यातील अनेक नागरीक अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी अडचणी येत असतात, स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशिक्षित नागरिकांना मदत न करता नाहक त्रासदायक वागणूक दिली जाते. भारतीय स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा व्हावी यासाठी पारनेर मनसेच्या वतीने स्टेट बँकेच्या आवारात ठिप्या आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी स्टेट बँकेचे पारनेर शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला होता यासंदर्भात शेवाळे यांना निवेदन देण्यात आले होते.मनसेचा हिसका दाखविताच शाखा व्यवस्थापक सुतासारखे सरळ झाले बँक कर्मचारी व अधिकारी यांच्याकडुन सौजन्याने वागणूक दिली जाईल, ग्राहकांना ताटकळंत बसावे लागणार नाही याची काळजी घेण्यात येईल, कामकाजाची वेळ सकाळी १० ते ४ या वेळेत ग्राहकांना सेवा दिली येईल आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कामकाजातील त्रुटी दुर करण्यात येतील असे लेखी आश्वासन शाखा व्यवस्थापक शेवाळे यांनी दिल्यानंतर ठिप्या आंदोलन स्थगित घेण्यात आले.
बँकेच्या तसेच ग्राहकसेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी सौजन्याने वागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत असे पत्रात म्हटले आहे. जेवणाच्या सुट्टीत कामकाज सुरू राहील याची काळजी घेतली जाईल तसेच बँकेच्या दर्शनीय भागात कामकाजाच्या वेळेचे फलक लावण्यात येणार असल्याचे शाखा व्यवस्थापक शेवाळे यांनी म्हटले.
बँकेच्या कामकाज सुधारणा न झाल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता याही पेक्षा अधिक तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला. यावेळी सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी.एन. साबळे साहेब, जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, सतिश म्हस्के,महेंद्र गाडगे, पारनेर शहर अध्यक्ष वसिम राजे,दिलिप जाधव, अतुल वरखडे, निखिल बोरकर, अविनाश औटी, अक्षय सुर्यवंशी,बंडु बनकर, मिलिंद काळे, सनि थोरात,आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment