पुण्यात खांदेपालट; आक्रमक नेत्याकडे मोठी जबाबदारी

पुण्यात खांदेपालट; आक्रमक नेत्याकडे मोठी जबाबदारी
नगरसेवक, मनपा गटनेते श्री. वसंत मोरे ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'पुणे शहराध्यक्ष'पदी नेमणूक.
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील ठरावीक नेत्यांनी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्यानंतर बुधवारी मा.राजसाहेब ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे उर्फ तात्या यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी मा. राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत (तात्या) मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत (तात्या) मोरे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली
कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत (तात्या)मोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या.

मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे सक्रिय
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी

मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे