खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’

खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’ मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट केलं असून विरोधी नेते मात्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आता मनसे नेत्या शालिनीताई ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘खंडण्या गोळा करायला जशी सरकारी यंत्रणा कामाला लावली… तशीच औषधं, ऑक्सिजन, बेडसाठी कामाला लावली असती तर आज महाराष्ट्रातील जनतेचे असे हाल झाले नसते.’ असा प्रहार शालिनीताई ठाकरे यांनी केला आहे.

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे