तहसील प्रशासनाच्या सुचना वाडी-वस्तीपर्यत पोहचवा- मनसेची मागणी
तहसील प्रशासनाच्या सुचना वाडी-वस्तीपर्यत पोहचवा- मनसेची मागणी
सुपा :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपनास विनंती करत आहे की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण तात्काळ सुपा गावठाण व वाड्यावस्तीवर सॅनिटायझर औषध फवारणी करणे गरजेचे आहे तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर औषध फवारणी करून कोरोना जनजागृती ऑडिओ वाडीवस्तीवर ग्रामपंचायत घंटा गाडीच्या माध्यमातुन समाजाची जनजागृती निर्माण करावी व लोकांच्या मनातील भितीचे वातावरण दुर करावे, अंगावर दुखने काढण्या पेक्षा लवकरात लवकर औषध उपचाराने कोरोना बरा होतो हे गावातील लोकांना ऑडिओ च्या माध्यमातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा,असे निवेदन मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार,सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, उपाध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सुपा ग्रामपंचायत यांना दिले.
सुपा ग्रामपंचायत ने तात्काळ प्रतिसाद देत आश्वासन दिले की दोन दिवसात सर्व ठिकाणी सॅनिटायझर औषध फवारणी करून जन जागृतीची ऑडिओ क्लिप सुपा गाव व वाडीवस्तीवर ऐकवून लोकांच्या मनातील भितीचे वातावरण दुर करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे.




Comments
Post a Comment