कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी आढावा बैठक

 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी आढावा बैठक



ठाणे :

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी तातडीने आढावा बैठक घ्या अशी मागणी मी मा.ना. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.ही मागणी मान्य करत त्यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.यावेळी आमदार राजू पाटील यांनी खालील मुद्दे मांडले.


1. रेमेडीसिवर इंजेक्शनचा महानगरपालिकेने रिसर्व कोटा ठेवावा. ज्यांना एमर्जन्सी मध्ये पाहिजे असेल तर रिप्लेसमेंट किंवा खरेदी करू शकतील.


2. महानगरपालिकेने तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये साधे बेड कमी करून व्हेंटिलेटर बेड तातडीने तयार करावेत. जेणेकरून नवीन कोविड सेंटर उभे करण्याआधीच जास्तीचे व्हेंटिलेटर बेड तयार होतील.


3. गेल्यावर्षी 2 ॲम्बुलन्ससाठी आमदार निधी दिला परंतु अद्यापही अंबुलन्स मिळालेल्या नाहीत. कोविड करता दिलेल्या आमदार निधीचा विनियोग जलद करण्यात यावा.


4. १ मे पासून सुरु होणारे लसीकरण केंद्र मोठ्या प्रमाणात चालू करावे व जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावे. तसेच आता बाहेरून येणारे परप्रांतीय लोकांना थेट प्रवेश न देता ठाणे जिल्ह्यातील सर्व सीमा सील करावी व त्यांची कोरोना चाचणी, जमल्यास लसीकरण व नोंद करून प्रवेश द्यावा.



 कल्याण-डोंबिवली मधील जनतेच्या हितासाठी अशा प्रकारे मुद्दे मांडले आमदार राजू पाटील यांनी आढावा बैठकिची मागणी केल्यानंतर मा.ना. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली याबद्दल त्यांचे राजू दादा यांनी मनापासून आभार मानले 


#MNS #MlaRajuPatil #RajuPatil #KDMC #COVID19

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे