मा.राजसाहेबांच्या 'या' मागणीची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावीच लागली
मा.राजसाहेब ठाकरेंच्या 'या' मागणीची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावीच लागली
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी गेल्यावर्षी केली होती मागणी
मुंबई | राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचेे आकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धवजी ठाकरेंनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी केेलेली एक मागणी मान्य केली आहे.
सरकारला स्वत: ची चुक कळली”; राज ठाकरेंची ती मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य
परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी ठेवा, अशी मागणी मा. राज साहेबांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी तसं काही झालं नाही. आता कोरोनाची लाट आली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यामुळे ही लाट ओसरल्यावर मजुर पुन्हा येतील. याच पार्श्वभूमीवर आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, असं उद्धवजी ठाकरेे म्हणाले.
या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मा.राजसाहेब ठाकरे जेव्हा सरकारला एखादी सूचना करतात तेव्हा ती महाराष्ट्राच्या हिताचीच असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करा अशी सूचना मा राजसाहेब ठाकरेंनी केली होती. पण त्याचे राजकारण केलं गेलं. पण आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा सरकारला चुक कळली आणि मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशाप्रकारचे आदेश दिले.
"टाळेबंदीनंतर राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करा, अशी सूचना राजसाहेबांनी सरकारला केली होती. उशिरा का होईना सरकारला उपरती झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना परप्रांतीय मजुरांची नोंदणी व आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले." - मनसे नेते @1nitinsardesai
https://t.co/3RxTTF8jZt
Comments
Post a Comment