कोरोनाची नव्हे तर पोटाचे खळगे कसे भरायचे याची गरिबांना काळजी

शिवभोजन थाळी गावागावात सुरु करा - अविनाश पवार(मनसे उपाध्यक्ष)यांची मागणी


पारनेर :

 महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने राज्य लाॅकडाउन चालु केल्यामुळे मोलमजुरी करणार्‍यांवर मोठे संकट आले आहे कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष आर्थिक मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत, त्यामुळे शासनाने चालु केलेली शिवभोजन थाळी गावागावात तात्काळ चालु करावी, आज काम केले तर उद्या काय खायचे अशा गोरगरीब गरजुंना कोरोनाची भीती नव्हे तर पोट कसे भरायचा असा गंभिर प्रश्न पडला आहे, अशा नागरिकांचा पोटाचा प्रश्न तात्काळ सोडवावा,                  आज शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होवुन आपल्यासाठी संघर्ष करत आहे अशा शासकीय आरोग्य कर्मचार्‍यांच्या परिवाराच्या लसीकरणासह काही आपत्ती निर्माण झाल्यास त्याची आर्थिक स्वरुपात संपुर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारुन त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी जेणे करुन त्यांच्या संघर्षात त्यांच्या कुटुंबाना कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागेल.
         त्याचबरोबर पारनेरला आरोग्य विभागात घेण्यात येणार्‍या कंत्राटी कामगारांचे विम्यासह लसीकरण करावे व कोविड सेंटमध्ये विनामास्क वावरणार्‍यांवर कठोर गुन्हा दाखल करावा जेणे करुन कोरोना संसर्ग सर्वसामांन्यांना होणार नाही अशा विविध मांगण्याचे लिखित पत्र मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी परिस्थितीचे गांभिर्य पाहुन पारनेच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना तातडीने पाठवीले आहे. निवेदनावर अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर व सतीश म्हस्के स्वाक्षरी  आहेत.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे