‘फकीर म्हणवून घेणाऱ्या आ.निलेश लंके यांच्याकडे एवढी संपत्ती कशी?’ मनसेचा सवाल

‘स्वता:ला फकीर म्हणवून घेणाऱ्या आ.निलेश लंके यांच्याकडे एवढी संपत्ती कशी?’ मनसेचा सवाल

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यांच्या उपक्रमाची राज्यासह देशात चर्चा होत आहे. अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे. तर काहींनी विविध शंका उपस्थित केल्यात. दरम्यान, सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करून आ.लंके यांनी मनसे पदाधिकाऱ्याला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे. यावर मनसेनेही त्यांच्यावर पलटवार केलाय. स्वत:ला फकीर म्हणवून घेणाऱ्या लंके यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल मनसेने केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार आणि आमदार लंके यांच्यात हा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी आमदार लंके यांनी आपल्याला फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. लंकेंवर आरोप करणारा व्हिडिओही पवार यांनी प्रसारित केला होता. त्यामध्ये लंके यांच्यासोबतच ते चालवित असलेल्या कोविड केअर सेंटरसंबंधीही आरोप केले होते. शिवाय लंके यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. यानंतर पवार यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला.

कामाची बदनामी झाली-आ.लंके

त्यानंतर लंके यांनी वकिलामार्फत पवार यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची नोटीस पाठवली आहे. पवार यांनी व्हिडिओ प्रसारित केल्याने आपली आणि आपल्या कामाची बदनामी झाल्याचे दावा त्यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी आणि एक कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असे नोटीस मध्ये म्हटले आहे.

दबाव टाकणे कदापी खपवून घेणार नाही

यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भुतारे यांनी म्हटले आहे की, ‘स्वत:ला फकीर म्हणून घेणाऱ्या लंके यांनी एक कोटी रुपयांचा हा दावा ठोकला कसा? मनसेच्या पदाधिकाऱ्यावर असा दबाव टाकणे कदापी खपवून घेणार नाही. पवार यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू.’ तर ज्यांना नोटीस पाठवण्यात आलीये ते पवार म्हणाले, ‘लंके यांना फकीर म्हटले जाते. मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून?. दरम्यान, या वादाची नगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. अद्यापही राष्ट्रवादी आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर भाष्य केलेले नाहीये.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे