नोडल अधिकारी म्हणून बीडीओची नियुक्ती : मनसेचे तालुका उपाध्यक्ष पवार यांच्या पाठपुराव्यास यश

 नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती : मनसेचे तालुका उपाध्यक्ष पवार यांच्या पाठपुराव्यास यश



मनसे अधिकृत पारनेर -


 कोरोनाची महामारी इष्टपती समजून रूग्णांची लाखो रूपयांची लुट करणाऱ्या लुटारू डॉक्टरांच्या बिलांवर आता पारनेरचे गटविकास अधिकारी ( बिडीओ ) किशोर माने यांचा आता वॉच असणार आहे . माने यांच्या मदतीला ऑडीटर म्हणून चार कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या आजारामुळे भयभीत झालेल्या रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या खचलेल्या मानसिकतेचा गैरफायदा घेत लाखो रूपये उकळले जात असल्याच्या तक्रारींचा अक्षरशः पाउस पडत आहे. रूग्ण दाखल होताच डॉक्टरांकडून हातभर औषधांची यादी लिहून दिली जाते. ही औषधे हॉस्पिटलच्याच मेडिकल मधुन घेण्याचे बंधन घातले जाते. रूग्ण दाखल करताना अनामत रक्कम भरून घेतली जातानाच अनावश्यक चाचण्यांच्या नावाखाली रूग्णांना अक्षरश: नागवले जाते.

एकीकडे कोव्हीड सेंटरमध्ये पैसे न घेता उपचार केले जातात तर दुसरीकडे खाजगी रूग्णालयांमध्ये एका बेडसाठी दररोज हजारो रूपये उकळले जातात. डॉक्टरांची व्हिजीट, नर्सिंग चार्जेस, पीपीई कीट आदींच्या माध्यमांतुन सुरू असलेल्या लुटीविरोधात मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.

मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाशजी पवार यांनी त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रूग्णांची होणारी लुट थांबविण्याची मागणी केली होती. पवार यांच्या या मागणीची दखल घेऊन पारनेर तालुक्यातील रूग्णांसाठी पारनेरचे गटविकास अधिकारी श्री. किशोर माने यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांना मदत करण्यासाठी ऑडीटर म्हणून आणखी चार कर्मचाऱ्यांची टिम नियुक्ती  करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले .

पारनेर तालुक्याबरोबरच शिरूर, आळेफाटा, नगर येथे पारनेर तालुक्यातील रूग्ण दाखल होतात. त्याबाबतच्या तक्रारी सुद्धा गटविकास अधिकारी माने यांच्याकडे करता येणार आहेत. रूग्णांची लुटमार करणाऱ्या हॉस्पिटल, मेडीकल तसेच विविध चाचण्यांची बिले गटविकास अधिकारी माने ( मोबाईल क्र. ८६००८२२७६५) यांच्याकडे तपासणीसाठी पाठविल्यास त्यात आकारण्यात आलेल्या जास्तीचे बिल कमी करून उर्वरीत बिल स्विकारण्या संदर्भात सबंधितांना आदेश देण्यात येणार आहेत .

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे