अमित ठाकरेंना त्या ‘खुर्ची’वर बसवा; पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे ‘मनसे’ मागणी

अमित ठाकरेंना त्या ‘खुर्ची’वर बसवा; पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे ‘मनसे’ मागणी

Raj Thackeray - Amit Thackeray

मुंबई : काही दिवसांपूर्वीच आदित्य शिरोडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिरोडकरांनी मनसेला राम राम ठोकल्याने सध्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी आहे. त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे मनविसेचे अध्यक्षपद सोपवून त्यांना आदित्य शिरोडकरांच्या ‘खुर्ची’वर बसवावे, अशी आग्रही मागणी मनवि सेनेचे पदाधिकारी आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे केली.

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट दिली. अमित ठाकरे यांना विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद द्यावं यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पानसांगे, उपाध्यक्ष नितेश खाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना निवेदन सादर केले.



Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे