पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान 
पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी जवळा गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती संभाजी महाराजांची तुलना ग्रामपंचायत सदस्या सोबत करुन तो व्हिडिओ प्रसारीत करुन महाराष्ट्रातील  शिवप्रेमीच्या भावना दुखावल्याने.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने आम्ही ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो व आमदार निलेश लंके यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल दोन दिवसात तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेची जाहीर माफी मागितली नाही तर पारनेर तालुक्यातील शिवप्रेमी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ तसेच नगर जिल्हा पदाधिकारी व तमाम शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या बाबत पारनेर पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस उपनिरिक्षक गणेश पंदरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जिम्मेदार पारनेरचे लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके राहतील. यावेळी सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के,जिल्हा उपाध्यक्ष.मारुती रोहकले,तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार,महेंद्र गाडगे, शहर अध्यक्ष वसीम राजे, सतीश म्हस्के,स्वप्निल आतकर,रविंद्र रासकर,गणेश रासकर,अक्षय सुर्यवंशी लक्ष्मण नह्रे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे