ठाकरेंचे फटकारे मग ते शाब्दिक असो की कुंचल्यानं ...

- प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत,नाशिक यांच्या लेखनीतून..
ठाकरेंचे फटकारे मग ते शाब्दिक असो की कुंचल्यानं ... ते फारच चर्चेत येतात.बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी तर उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं.
त्यांची हीच कला राज ठाकरे यांना जात्याच अवगत झाली. मिश्कीलपणा ... भेदक नजर ... आणी शब्दांनी ओढलेले आसूड ... राज ठाकरे यांच्या स्वभावाचे अनेक पैलू,त्यांच्या व्यंगचित्रातूनही व्यक्त होतात.
आता ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीलाही,याच कलेची उपजत देणगी असल्याचा प्रत्यय नाशकात आला.
निमित्त होतं अमित राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचं ...
अमित ठाकरे हे संदीप देशपांडे आणी अमेय खोपकर यासह नाशकातील मनसे कार्यालयात दाखल झाले.कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीनं त्यांचं स्वागत केलं आणी लागलीच पत्रकारांना त्यांना सामोरं जावं लागलं. एकीकडे संदीप देशपांडे यांचं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं सुरू होतं तर दुसरीकडे त्यांच्याच शेजारी बसलेल्या अमित ठाकरे यांनी हातातील पॅडवर असलेल्या कागदावर रेखाटन सुरू केलं. समोर बसलेल्या पत्रकारातील टीव्ही 9 चे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे वारंवार जाणारं त्यांचं लक्ष,पत्रकारांच्याही लक्षात आलं. लागलीच कॅमेऱ्याच्या मोर्चा वळला. दरम्यान,पत्रकार परिषद आटोपली आणी त्याचवेळी अमित ठाकरे यांनी एका पेननं रेखाटलेलं चित्र सगळ्यांना दाखवलं. चंदनचं मास्क घातलेलं त्यांनी केलेलं रेखाटन फारच बोलकं होतं. ते पाहताच,सगळ्या पत्रकारांचे चेहरेही आनंदानं बोलके झाले. खुमासदार चर्चा रंगली.खास चंदनचंच चित्र रेखाटलं म्हणून सगळ्यांना आनंदही झाला.काहीसे मितभाषी असणाऱ्या अमित ठाकरे यांचा हा राजकीय दौरा ... या दौऱ्यातील त्यांची समयसूचकता ... कार्यकर्त्यांत विश्वास जागवणारी शैली ...यासह त्यांच्यातील ही कलाही सांगून गेली की ठाकरेंच्या याही शैलीचे तिसरे वारसदार अमित ठाकरे हेच आहे.

- प्रशांत बाग
न्यूज 18 लोकमत,नाशिक.

#RajSaheb_Thackeray
#AmitSahebThackeray
#MNS
#mnsadhikrut
साभार
Lokmat

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे