सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश 
पारनेर : 
पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने मनसेला पारनेर शहरात बळकटी मिळाली असुन येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे 
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला भाऊसाहेब खेडेकर यांना पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली असुन  अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले संघटन कौशल्य व तालुक्यातील तळागाळातील घटकापर्यंत असलेला दांडगा संपर्क यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामे केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये २०१९ मध्ये नगर - पारनेर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात दारुण पराभव झाला परंतु सामाजिक कार्यामध्ये खंड पडु न देता कार्य सुरू आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेरमध्ये सुरु असलेले काम व पक्ष प्रवेश यामुळे तालुक्यात बळकटी मिळाली आहे.

यावेळी अहमदनगर शहर सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार,  सतिश म्हस्के, पुरुषोत्तम सोमवंशी, सचिन गोरे, बंटी ठाणगे  उपस्थित होते.

"मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरेच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडत तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत लवकरच भविष्यातील रणनीती आखुन कामास सुरुवात करणार आहे."
         - भाऊसाहेब खेडेकर

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे