पारनेर तालुक्यात मराठी पाठ्या नसणाऱ्या आस्थापनांना लवकरच मनसे स्टाईल धडा

पारनेर तालुक्यात मराठी पाठ्या नसणाऱ्या आस्थापनांना लवकरच मनसे स्टाईल धडा 

"दुकानांवरील पाट्या मराठीत हव्यात' हा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच धरला आहे. पारनेर तालुक्यातील व्यापारी,आस्थापने यांच्या दुकानावरची मराठी भाषेत नसल्यामुळे मनसेचे तालुका उपाध्यक्ष मा. अविनाश पवार यांनी त्यांना शासन आदेश आणि पक्षाचे निवेदन दिले"

मराठी भाषा मराठी संस्कृती आणि मातृ भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्यातील नोंदणी कृत आस्थापनांवर असलेले फलक मराठी भाषा मध्ये मोठ्या अक्षरात लावावेत असे पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली होती पण पारनेर तहसीलदार यांनी तोंडी  आश्वासन देऊन पण कारवाई केली की नाही कोणतेही उत्तर दिले नाही  त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवेदनात इशारा दिला होता  
आपल्या मनसे  स्टाईल मध्ये धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच  १५ दिवसाचा अल्टीमेट संपला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी इतर भाषेतील फलक काळे होणार व  सुरवात  सुपा एम आय डिसी मधील कंपनी आस्थापनावरील फलक काळे होणार आता संघर्ष अटळ आहे त्यामुळे याला सर्वस्वी जिम्मेदार पारनेर तहसील प्रशासन व आस्थापन मालक व व्यवस्थापन राहील. असे मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी  सांगितले.
#राजभाषा_मराठी #MNSAdhikrut

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे