पारनेर मनसेकडुन मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा
पारनेर तालुक्यात मनसेकडुन मराठी भाषा दिन धुमधडाक्यात साजरा
"मराठी स्वाक्षरी अभियान " व मराठी पाट्या असणाऱ्या आस्थापनांच्या मालकांचा सत्कार करून मराठी भाषा दिन साजरा
पारनेर -
प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. आपल्या मातृभाषेला गौरव व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. २१ जानेवारी २०१३ पासून कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.२७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो
काही दिवसापूर्वी मराठी भाषा दिन धुमधडाक्यात साजरा करावा, असे आदेश मा. राजसाहेब ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत मराठी टिकवायची असेल तर मराठी भाषा बोलणे गरजेचे आहे असे हि सांगितले होते. २७ फेब्रुवारी हा दिवस आपण महाराष्ट्रात “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करतो. “गौरव दिवस” या पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, मनसे पक्षाने सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली. हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा असे आव्हान मा. राजसाहेब ठाकरे यांनी केले होते .
आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा “गौरव” दिवस आहे हा. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी दूरदृष्टी असणारी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, ह्या सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच !
अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा, ह्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज “मराठी भाषा गौरव दिवस” आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा. संपूर्ण राज्यात ह्या दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा.असे आव्हान राजसाहेब ठाकरे यांनी करताच
पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दि २७ फेब्रुवारी रोजी पारनेर येथे मराठी भाषा दिन साजरा केला यावेळी पारनेर शहरामध्ये ज्या दुकानाच्या पाट्या मराठी मध्ये आहेत त्या दुकानदार मालकांचा सत्कार आज करण्यात आला. तसेच माझी स्वाक्षरी मराठी असे अभियान राबविण्यात आले. यामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते पारनेर मधील ग्रामस्थ यांनी आपली स्वाक्षरी मराठी मध्ये करून हे अभियान यशस्वी रित्या संपन्न झाले.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष शहाजी येवले पाटील, पारनेर शहराध्यक्ष-महेश चेडे,सतीश मस्के, विद्यार्थी सेनेचे सचिव जालिंदर बांडे, उपाध्यक्ष अजय दावभट, अनिल भांडारकर, राहुल औटी, नवनाथ काणे, स्वनिल चेडे,अजय चेडे, करण शिंदे, मच्छु शिंदे, सुरेश शिंदे, मनोज डोंगरे, रामनाथ चेडे व मनसे सैनिक तसेच पारनेर मध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[ प्रत्येक दुकानावरची पाटी मराठी भाषेतच हवी, हा आग्रह मनसेने धरला रस्त्यावर उतरून आंदोलनं केली मनसेच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल झाले, मोबाईल फोन सेवा पुरवठादार कंपन्यांना ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्यास, मराठीत सूचना देण्यास भाग पाडलं, विविध बँका, कंपन्यांच्या कॉल सेंटरमधून फोन करणारे प्रतिनिधी मराठी भाषेत बोलू लागले. विमानतळ, रेल्वे स्थानकांवर नियमितपणे मराठीत उदघोषणा सुरू झाल्या. मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइम शो मिळवून दिले. अमेझॉन, डॉमिनोज पिझ्झा आदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पोर्टल्सवरील विक्री सेवा मराठी भाषेत लवकरच उपलब्ध होणार हे फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने झाले. मा. राज साहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते असाच कायम पुढे चालू ठेवू.
बाळासाहेब माळी
(पारनेर तालुका मनसे अध्यक्ष ) ]
प्रतिनिधी -किरण थोरात
Comments
Post a Comment