आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका मनसे स्वबळावर लढविणार

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती  निवडणूका मनसे स्वबळावर लढविणार -  मनसे अध्यक्ष बाळासाहेब माळी
बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत मनसेचा भव्य कार्यकर्ता मेळावा 

पारनेर:
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे दौरे सुद्धा सुरू झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनसे नेते मा. श्री. बाळा नांदगावकर साहेब नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर  येणार आहेत . मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच इतर पक्षांना धक्का देत शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश होणार आहे. याच पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पारनेर तालुका आढावा बैठक दि.१ मार्च रोजी सकाळी ११ वा शासकीय विश्रामगृह पारनेर येथे जिल्हा अध्यक्ष मा. देविदास खेडेकर, मा.सचिन डफळ, बाबासाहेब शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणूकी मध्ये मनसे तालुक्यातील सर्वं जागा स्वबळावर लढविणार असल्याचे तालुका अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब माळी यांनी सांगितले. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागा असा आदेश ही देण्यात आला आहे. मा. जिल्हा अध्यक्षांचा तालुका दौरा, आढावा बैठका ह्या मनसे नेते मा. श्री. बाळा नांदगावकर साहेब येत्या १३ मार्च रोजी नगर जिल्ह्या दौऱ्यावर येणार आहेत याची पुर्वतयारी आहे. जिल्ह्याची आढावा बैठक तसेच पदाधिकाऱ्यांच्या  नियुक्त्या व मनविसेच्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांच्या  कामकाजाचा आढावा घेतील यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, गेली अनेक वर्षे नगर जिल्ह्याला आलेली मरगळ झटकून नवसंजीवणी देण्यासाठी ह्या मेळाव्यात शाखाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष पर्यंत फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

मनसेत तरुणांची  इनकमिंग सुरूच -
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील तरुणांनी  पक्ष प्रवेश केला आहे यामध्ये विशाल दुधाडे,ओमकार दुधाडे,मयूर कोल्हे, योगेश ठोंबरे, सुदर्शन नरवडे, स्वप्निल दुधाडे, महेश सोंडकर, करण दुधाडे, विशाल कोल्हे आदींनी मनसे मध्ये पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी तालुका अध्यक्ष मा. बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, शहर अध्यक्ष महेश चेडे, वाहतुक सेनेचे तालुका अध्यक्ष शहाजी येवले, तालुका सचिव गणेश तांबे,  उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, अविनाश पवार, रविंद्र चत्तर, रोहिदास खोडदे, मनसे नेते वसिम राजे, सतिश म्हस्के, विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव जालिंदर बांडे, नवनाथ काणे, किशोर व्यवहारे, सागर चेडे, स्वप्निल चेडे, अनिल भांडारकर इ. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे