मनसेच्या इशाऱ्यानंतर लगेच वीजपुरवठा सुरळीत

मनसेच्या इशाऱ्यानंतर लगेच वीजपुरवठा सुरळीत 
पोखरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा देताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पवळदरा येथे रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू केला. तीन महिन्यांपासून रोहित्र बंद असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अंधारात राहावे लागले. तसेच शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वीज नसल्याने त्रास सहन करावा लागला. यासाठी मनसेचे तालुका उपाध्यक्ष महिंद्र गाडगे यांनी त्वरित रोहित्र सुरू करावे, अशी मागणी महावितरणकडे केली. मनसेचा आक्रमक पवित्र लक्षात घेताच महावितरणच्या संबंधित रोहित्र सुरू केले.
तालुक्यातील पोखरी पवळदरा येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवीन रोहित्र बसविण्यात आले. मात्र, नवीन रोहित्र बसविले असले तरीही त्याचा वीजपुरवठा महावितरणने सुरळीत सुरू केला नव्हता. रोहित्र असूनही शेतकऱ्यांना फायदा मिळत नव्हता. अनेक महिन्यापासून रोहित्राचा वीज पुरवठा बंद होता त्यामुळे मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष महेंद्र गाडगे यांनी रोहित्र सुरू करा, अन्यथा आपण रोहित्राचा वीज पुरवठा सुरू करू, असा इशारा दिला होता .
विज पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.तसेच मनसेचे आभार मानले

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे