रेल्वे माल धक्यातील माथाडी कामगारांचे शोषण थांबवा

अहमदनगर रेल्वे माल धक्यातील ५८५ नोंदणी कृत माथाडी कामगारांचे होणारे शोषण कामगार आयुक्तांनी त्वरीत थांबवावे अशी मागणी मनसे माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे.
अहमदनगर रेल्वे माल धक्यातील माथाडी कामगारांना कडुन तक्रार प्राप्त झाल्यावर माथाडी कामगार सेनेचे
राज्य अध्यक्ष अरविंद गावडे , तसेच सरचिटणीस अनिल चितळे साहेब , महेंद्र जाधव , डि.एन. साबळे , जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार , सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के यांनी प्रत्येक्ष भेट दिली असता कामगारांचे खऱ्या अर्थाने शोषण चालु असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले. अहमदनगर रेल्वे स्टेशन माल धक्का विळद घाट येथे स्थलांतरित करण्यास कामगारांचा विरोध असताना सुद्धा प्रयत्न केला गेला, कमी पगारात काम करण्यासाठी ठेकेदाराकडुन दबाव असल्याचे कामगारांनी सांगितले . कामगारांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न ठेका घेतलेली कंपनी करत असल्याचे समजले हुंडेकरी सोबत करार मार्च २०२१ मध्ये झाले असुन फरक बिल वारई बिल , व पगार फरक बिल अजुन पर्यंत थकीत आहे परप्रांतीय कामगारांना अनाधिकृत पणे माल धक्कात प्रवेश देऊन कमी रोजाने कामे करून घेतली जातात प्रत्येक महिन्याचा पगार १५ ते २० दिवस उशिरा होता.
 पिण्याचे पाण्याची सुविधा नाही, किंवा हात पाय धुण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही स्वच्छता गृहाची कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही सरकारी कुठल्याही प्रकारची सुविधा योजनांचा आत्तापर्यंत देण्यात आला नाही कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अथवा आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही कामगारांना येण्याची व जाण्याची सुविधा उपलब्ध नाही वारईचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही, जेवण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची स्वतंत्र सुविधा उपलब्ध
नाही ८.३३ % बोनस मधून ४ हजार रुपये कटिंग श्रमीक हॉस्पीटल मध्ये गोळ्या सोडून दुसरी औषध उपलब्ध नाही किंवा खाजगी हॉस्पीटल मध्ये कामगारांनी जाण्यासाठी स्वतः डॉक्टर सांगतात. माल धक्यामध्ये काम करत असताना अपघात होऊन अपंगत्व आले असताना सुद्धा त्या कामगारांकडुन कामे करुन घेतली जातात. 
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून १५ दिवसात योग्य चौकशी करू कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या वतीने कामगार सह आयुक्त श्री.नितीन कवले साहेब यांची प्रत्येक्ष भेट घेऊन करण्यात आली आयुक्त यांनी सुध्दा दखल घेऊन मदत करण्याच आश्वासन दिले आहे जर १५ दिवसात अपेक्षित बदल होऊन कामगारांना न्याय मिळाला नाही तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी तिव्र स्वरूपाचे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल व यास जबाबदार आयुक्त रहातील असे माथाडी कामगार सेना जिल्हा अविनाश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे