“जरांगे पाटील उपोषण थांबवा, आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे”
“जरांगे पाटील उपोषण थांबवा, आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे” पत्रातून नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ? वाचा सविस्तर 31 October 2023 मुंबई : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन चांगलंच तापलं आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. सरकार अनेक पद्धतीने मनवायच्या भूमिकेत आहे . परंतु मनोज जरांगे पाटील मात्र उपोषणावर ठाम आहेत. आता, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहून जरांगे पाटलांना भावनिक आवाहन केलं आहे. तसेच, विशेष अधिवेशन बोलावण्याचीही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झ...